प्याँगचँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्यॉंगचॅंग दक्षिण कोरियाच्या गंगवान प्रांतातील शहर आहे. टॅबॅक पर्वतरांगेतील या शहरात अनेक बौद्ध मंदिरे आहेत. २०१३ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ४३,६६६ होती.

देशाची राजधानी सोलपासून १८० किमी आग्नेयेस असलेल्या या शहरात २०१८ चे हिवाळी ऑलिंपिक खेळ भरले होते.