पोलके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोलके हा स्त्रियांनी वापरायच्या चोळीचा मराठी पद्धतीचा एक प्रकार आहे. विशेषकरून लहान व किशोर वयोगटातील मुली पोलकी घालतात. शरीराच्या वक्षस्थळास व पाठीच्या वरील भागास झाकणाऱ्या या कपड्यास दोन बाह्या असतात. हे सहसा परकरासोबत घातले जाते.