पोप लिओ बारावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोप लिओ बारावा

लिओ बारावा (ऑगस्ट २२, इ.स. १७६० - फेब्रुवारी १०, इ.स. १८२९) हा इ.स. १८२३ ते मृत्युपर्यंत पोप होता.

याचे मूळ नाव ऍनिबेल फ्रांसेस्को क्लेमेंते मेल्चिओर गिरोलामो निकोला डेला गेंगा असे होते. त्याने रोमच्या अकेडेमिया डेइ नोबिलि एक्लेसियास्टिसी येथे शिक्षण घेतले व इ.स. १७८३ साली धर्मगुरुपद प्राप्त केले.

यानंतर त्याने पोप पायस सहाव्याचे व्यक्तिगत सचिवपद मिळवले. पोप म्हणून लिओ असहिष्णु व कठोर होता. स्वतःच्याच प्रजेविरुद्ध त्याने अनेक कट-कारस्थाने केली. कदाचित त्यामुळे त्याच्या मृत्युनंतर त्याच्या राज्यात आनंदच व्यक्त केला गेला.

मागील:
पोप पायस सातवा
पोप
इ.स. १८२३फेब्रुवारी १०, इ.स. १८२९
पुढील:
पोप पायस आठवा