Jump to content

पोकळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोकळा ही तांदुळजा, माठ आणि राजगिरा यांच्याशी साधर्म्य असणारी एक पालेभाजी आहे.काही भागात याला पोकळी या नावाने ओळखतात.पोकळा प्रामुख्याने खान्देशातील धुळे नंदुरबार आणि जळगाव तसेच कोल्हापूर या ठिकाणी आढळतो.[] [] हिरवा पोकळा व तांबडा पोकळा असे या पालेभाजीचे दोन प्रकार आहेत. तांबड्या प्रकारच्या भाजीची पाने काळसर लाल व लांब देठाची असतात.पोकळा या क्षुपाची उंची २०-३० सेंमी. असते. खोड प्रथम मऊ परंतु नंतर काहीसे कठीण होते. पाने एकाआड एक, साधी व लांब चमच्यांसारखी असून त्यांवर तांबड्या रेषा असतात. फुले लांब मंजिरीत येतात. ती शुष्क, लहान व द्विलिंगी असून परिदले हिरवट-पांढरी व संयुक्त असतात. फुलांमध्ये ४-५ पुंकेसर असतात.पोकळा थंडावा देणारा,सहज पचनारा भूक वाढविणारा व त्रिदोशनाशक आहे. याच्या बिया भाजून खातात. या वनस्पतीत १०० ग्रॅम मध्ये २.९ ग्रॅम प्रथिने व १८.१८ मिग्रॅ. लोह असते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "मराठी विश्वकोशावर पोकळा". २७ ऑक्टोबर २०१२ रोजी पाहिले.
  2. ^ "मराठी विश्वकोशावर तांदुळजा". २७ ऑक्टोबर २०१२ रोजी पाहिले.