पॉल क्रोनिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॉल क्रोनिन
जन्म ८ जुलै १९३८ (1938-07-08)
जेम्सटाउन, दक्षिण ऑस्ट्रेलिया,[१] ऑस्ट्रेलिया
मृत्यू १३ सप्टेंबर, २०१९ (वय ८१)
मेलबर्न, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया
पेशा अभिनेता
जोडीदार हेलन[१]
अपत्ये 4


पॉल क्रोनिन (८ जुलै १९३८ - १३ सप्टेंबर २०१९) [२] हा एक ऑस्ट्रेलियन अभिनेता होता ज्याने ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजन मालिका मॅटलॉक पोलीस आणि द सुलिव्हन्स मध्ये भूमिका साकारल्या होत्या. मार्टिन सॅक सारखाच तो ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक प्रतिष्ठित अभिनेता ओळखला जातो. त्याने १९७८ पासून सलग तीन वर्षे सलग तीन वेळा सर्वात सन्मानित अभिनेत्याचे पुरस्कार मिळवले आणि पाच रौप्य पुरस्कार जिंकले. [३]

त्याचा जन्म १९३८ मध्ये विस्टो, दक्षिण ऑस्ट्रेलिया मधील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. एक तरुण माणूस म्हणून क्रोनिन मेलबर्नल गेला आणि तिथे त्याने वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. अभिनय कारकिर्दीत त्याने होमिसाईड (ऑस्ट्रेलियन टीव्ही मालिका), डिव्हीजन ४ यासह अनेक क्रॉफर्ड प्रॉडक्शन मध्ये कामे केली. क्रॉफर्ड प्रॉडक्शन्सच्या मॅटलॉक पोलीस (१९७१ – ११७६) मध्ये क्रोनिन मोटरसायकल पोलीस म्हणून गॅरी होगन म्हणून दिसला आणि त्यानंतर सोलो वन (१९७६) म्ध्ये. १९७६ ते १९८३ या काळात लोकप्रिय ऑपेरा द सुलिव्हन्स मध्ये त्याने डेव्हिलीव्हानची मध्यवर्ती भूमिका केली होती.

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Talking Heads - Paul Cronin". abc.net.au. Archived from the original on 30 March 2010. 15 September 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Australian TV legend Paul Cronin dies, aged 81". 7NEWS.com.au. 14 September 2019.
  3. ^ "Tributes flow for Paul Cronin, actor who helped bring AFL to Queensland". ABC News (इंग्रजी भाषेत). 14 September 2019. 14 September 2019 रोजी पाहिले.