पेनल्टी शूटआउट (फुटबॉल)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१२ युएफा चॅंपियन्स लीगच्या अंतिम सामन्यामधील पेनल्टी शूट-आउट

पेनल्टी शूट-आउट हा प्रकार फुटबॉल खेळाच्या सामन्यांमध्ये वापरला जातो. जर मर्यादित ९० मिनिटांच्या खेळानंतर व ३० मिनिटांच्या ओव्हरटाईमनंतर देखील सामना गोलबरोबरी स्थितीत राहिला असेल तर पेनल्टी शूट-आउटचा वापर होतो. ह्या पेनल्टी किकचे नियम साधारण खेळामधील पेनल्टी किकपेक्षा वेगळे आहेत.

पेनल्टी शूट--आउटदरम्यान दोन्ही संघांना किमान ५ वेळा किक मारण्याची संधी दिली जाते. जो संघ सर्वाधिक वेळा गोल करेल तो विजयी घोषित केला जातो.