पूर्वगृहीत व्यामिश्र प्रश्न (तर्कशास्त्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्यापक अर्थाने, पूर्वगृहीत व्यामिश्र प्रश्नकर्ता संबधीत प्रश्नात, स्वतःच उत्तर सुचवून अथवा ते गृहीत ठेवत असतो.तुम्ही कोल्हापूरकडे जाण्यास निघणार आहात का साताऱ्याकडे ? या प्रश्नात प्रश्नकर्ता, श्रोता व्यक्ती निघणार आहे हे गृहीत धरून बोलते त्या शिवाय इतर शक्यता टाळत, केवळ उपलब्ध करून दिलेल्या मर्यादीत पर्यायातूनच निवड झाली पाहिजे अशी गळ/सूचना घातली जाते.

चहा घेणार का कॉफी?हा सरळ साधा क्लोज एंडेड प्रश्न आहे, आधण तयारच आहे, चहा टाकू का कॉफी ? हा प्रश्न दोन्ही पैकी एक हवं असणार हे गृहीत धरतो.विपणन क्षेत्रातील विक्रेते अप्रत्यक्ष प्रकारची ऑर्डर मागताना अशा स्वरूपाचे क्लोज एंडेड प्रश्न तयार करण्याकरता अशा प्रश्नांचा उपयोग करू शकतात, उदाहरणार्थ - आपल्या करता हिरव्या रंगाच्या शालु सोबत, नारंगीपण देऊ का ? ग्राहकास हिरव्या रंगाचा शालु हवा आहे असे समजून त्यास प्रश्न विचारणे.

तुम्हाला चहा आवडतो, तेव्हा चहा टाकूना ?, तुम्ही चहा/जेवण येताना करून आला (अ|न)सालना ?, मी नारंगी साडीत छान दिसते का हिरव्या ? हे भिन्न परिणाम साधणारे प्रश्न, उत्तर देणाऱ्यास आधीच गृहीत धरतात. काही वेळा अशा पूर्वगृहीत व्यामिश्र प्रश्नांतील तार्किक उणीवांचा गैरउपयोग, एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला हवे तेच उत्तर गैरवाजवीपणे मिळवण्याकरता करतानाच, इतर श्रोत्यांची दिशाभूल करण्याकरताही केल्या जाऊ शकतो.

प्रश्नातून गर्भितार्थ गोवणे[संपादन]

दिशाभूल करणारे संवाद साधताना,ते सरळ उघडपणे न मांडता,पुर्वग्रदुषीत गर्भितार्थाकडे निर्देश करणाऱ्या प्रश्नाची रचना केली जाते.उदाहरणार्थ -"श्री.जोन्स यांचा भाऊ, आर्मीत आहे काय ?" हा प्रश्न श्री.जोन्स यांना भाऊ असल्याचा उघड दावा करत नसला तरी त्यांना भाऊ असल्याचे सुचीत करण्याचा प्रयत्न करतो, कारण भाऊ आहे हे पूर्वगृहीत धरल्या शिवाय तो आर्मीत आहे किंवा नाही असा प्रश्नच निर्माण होणार नाही.[१]. अशा प्रश्नाने प्रश्नकर्त्यास खोटे दावे केल्याच्या आरोपांपासून स्वतःचा बचाव करून घेता येणे काही अंशी शक्यही होते, आणि वरून व्यामिश्र प्रश्नाच्या आडून पुर्वग्रहदुषित गर्भितार्थाकडे निर्देश करण्याचा उद्देश साध्य करता येतो.येथे तार्किक उणीव ही प्रश्नात दिसत नाही,गृहीत विधानाला पाठबळ देण्यास काहीतरी पुरावा असल्याशिवाय, असा प्रश्न केला जाणार नाही असा पुर्वग्रह तार्किक उणीव अथवा भ्रम ऐकणाऱ्या व्यक्तीस उत्पन्न होतो. "श्री.जोन्स यांचा भाऊ, आर्मीत आहे का ?" ह्या प्रश्नातील उदाहरण प्रथमदर्शनी नुकसानदायक दिसणार नाही,पण हाच प्रश्न श्री.जोन्सच्या आईस एकच मुलगा असल्याचे माहित असून त्यांना असा प्रश्न विचारल्यास प्रश्नाचा अर्थ आणि उद्देश बदलतो.किंवा "श्री.जोन्स यांचा भाऊ,जेल मध्ये आहे का ?" हेही उदाहरण लक्षात घेता येऊ शकेल .

प्रश्नातून गर्भितार्थ प्रकारात, अपेक्षीत परीणाम साधण्याकरीता,वस्तुस्थितीस काहीतरी पुरावा असल्याशिवाय विचारले जाणार नाही असे वाटण्याजोगे, काहीतरी असामान्य गृहीत प्रश्नातून गोवले जाण्याची आवश्यकता असते.उदाहरणार्थ "श्री.जोन्स यांना भाऊ आहे का ?" हा सरळ प्रश्न, श्रोत्यास आंतर्भूत सुचवणी असल्याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करणार नाही.

प्रकार[संपादन]

तार्किक उणीवातील बहुप्रश्न तर्कदोष आणि दुहेरी अथवा तीहेरी प्रश्न हे याचे मुख्य प्रकार आहेत.बेगींग क्वश्चन आणि petitio principii[मराठी शब्द सुचवा] हे तर्कदोष प्रकार मात्र सारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात वेगळे आहेत.

दुहेरी अथवा तीहेरी प्रश्न प्रकारात एक पेक्षा अधिक प्रश्नांच एकत्रीकरण करून एकच प्रश्न विचारला जातो.

  • तुला असं वाटतं का की,चिंट्याला गणित आणि हिंदी करता एक्स्ट्रा ट्यूशन क्लासची(अधिकच्या शिकवणी वर्गाची) गरज आहे ? प्रश्नाचे उत्तर केवळ 'हो' किंवा 'नाही' मध्ये दे.
उत्तर देणाऱ्या व्यक्तीस चिंट्याला गणित आणि विज्ञान ह्या विषयांना ट्यूशन क्लासची गरज आहे पण हिंदीला नाही असे म्हणावयाचे असेल तर त्याची पंचाईत होते.
  • कृपया पुढील विधानाशी सहमती अथवा असहमती दर्शवा : तो मालकांशी नेहमी एकनिष्ठ असतो आणि कामचुकारपणा करतो.
  • तुम्ही तुमचा पगार आणि कामावरच्या सहकाऱ्यांच्या सहकार्या बद्दल समाधानी आहात का ?
  • तुम्ही किती वेळा आणि किती वेळ दवाखान्याकरता खर्च करता ?
  • वस्तुला चांगलं मार्केट आहे आणि ती चांगली विकली जाईल असं तुम्हाला वाटतं का ?
  • शासनाने मिलीटरीवर कमी आणि शिक्षणावर अधिक खर्च केला पाहीजे का ?

संदर्भ[संपादन]

  1. ^ "संयुक्त प्रश्न,व्याख्या compound question, definition". [Legal-dictionary.thefreedictionary.com ]. 2010-02-03 रोजी पाहिले.