तार्किक उणीवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तर्कांतील त्रुटींमुळे मूलतः उणीववयुक्त निष्कर्षांचा आभास होतो. तर्कातील अशा त्रुटी आणि उणीवांना तर्कदोष असे म्हणतात. मराठी भाषेत क्वचित हेत्वाभास अथवा तर्कदुष्ट हे शब्द वापरलेले दिसतात परंतु तार्किक उणीवांची निर्मिती, श्रोत्यास, वाचकास फसवण्यासाठी हेतुत: अथवा दुष्टपणातूनच झाली असेलच असे नाही. युक्तिवादाच्या मुळाशी असलेली गृहीते चिकित्सक दृष्टीने अभ्यासण्यात तपासण्यात झालेल्या गफलतींमुळे एखादे गृहीत तत्त्व विचारात घ्यावयाचे राहून गेल्याने अथवा गृहीतांना योग्य त्या प्रमाणांत लक्षात घेणे राहिल्यामुळे, अथवा अनवधानानेसुद्धा तार्किक त्रुटी आणि उणीवा निर्माण होतात.


तार्किक उणीवांमधील दोष युक्तिवाद आणि निष्कर्षांना दुबळेपणा आणत असले तरी असे तर्क, वरकरणी सत्याचा आभास निर्माण करण्यात आणि त्यावर आधारित श्रद्धा वा विश्वास निर्माण करत मने वळवण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वीसुद्धा होताना दिसतात. हेतुत: असो नसो, श्रोता वाचकवर्ग मोठ्या प्रमाणावर फसतातसुद्धा.


स्पष्ट आणि चपखल शब्दांची निवड अथवा युक्तिवादाचे समर्थन करण्याकरीता पार्श्वभूमिका सबळपणे मांडण्यात आलेल्या अपयशानेसुद्धा तार्किक उणीवांची निर्मिती होऊ शकते. तार्किक उणीवांचे दोष युक्तिवाद आणि निष्कर्षांना दुबळेपणा आणत असले तरी असे तर्क केवळ युक्तिवाद मांडणाऱ्या व्यक्तीची मांडणी क्षमतेची मर्यादा असू शकतात.. तर्कदोषांनी दुबळे झालेल्या युक्तिवादाने समर्थनाचा प्रयत्न झालेले निष्कर्ष कदाचित, मूलत: सत्यही असू शकते. [१]

कामचालू[संपादन]

विविध कारणांनी आणि हितसंबंधांनी अधिकाधिक ध्रुवीकरण होणाऱ्या जगात समीक्षक, इतिहासकार, राजकारणी आणि इतर यांनी, 'स्नान घातलेले बाळ', आणि 'त्याने स्नान केलेले गढूळलेले पाणी', यांतील एकाला निवडताना आणि दुसऱ्याला दूर सारताना, या दोहोतील फरक, नम्रतेने आणि समंजसपणाने व्यवस्थिथीत समजून घेतला पाहीजे. [२] फिशर यांच्या मते शैक्षणिक क्षेत्रातील इतिहास संशोधकांकडून होणाऱ्या वस्तुनिष्ठतेतील त्रुटी क्वचितच जाणीवपूर्वक असतात. सदोष तर्कांमुळे ज्याचे स्वतःचे संशोधन आणि निष्कर्ष दूषित अथवा प्रभावित होतील, असा इतिहासकार त्याच्या वाचकांना्च केवळ भ्रमात टाकेल याची खरी भिती नाही, तर तो स्वतःलाच भ्रमात टाकेल याची आहे.

बौद्धिक कृष्णविवर[संपादन]

लोकांची विशिष्ट विचारधारेशी (मतप्रणालीशी) बांधिलकी होते आणि मग मिळालेली 'माहिती' विशिष्ट विचारधारेशी(मतप्रणालीशी) जुळवून घेण्याकरिता वापरली जाते.[३] विचारधारेशी(मतप्रणालीशी) विसंगत माहिती दुर्लक्षित (अस्वीकृत) केली जाते.

बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.[४]

युक्तिवादाने कोंडी केलीच तर बौद्धिक कृष्णविवरात फसलेल्या व्यक्ती तर्कांबद्दल संशय दर्शवतात. कोंडी करणाऱ्या तर्कास आणि युक्तिवादास 'ती एक निराळी श्रद्धा प्रणाली आहे' असे सांगून बोळवण करून स्वतःची सुटका करून घेण्याचा असतो. या कॢप्तीत सर्व युक्तिवाद, श्रद्धा, विचारधारा एकाच पातळीवर असून सरसकट (equally) "सयुक्तिक (reasonable)" अथवा "असयुक्तिक (unreasonable)" असल्याचा आभास निर्माण केला जातो. [५].'तुमचा विश्वास जेवढा योग्य आहे तेवढाच माझा विश्वास योग्य आहे' असे दाखवण्याचा प्रयास करत वेळ मारून नेत स्वतःची हार होतानासुद्धा ताठ मानेने बाहेर पडण्याच्या प्रयत्नास Stephen Law न्युक्लिअर बटन म्हणजे शेवटचा सुटकेचा मार्ग म्हणतात ज्यात तत्त्वज्ञानातील प्रॉब्लेमला smokescreen[मराठी शब्द सुचवा](धूम्रावरण/धुराचा पडदा) म्हणून वापरले जाते, त्यामुळे त्यांचा तर्कांबद्दल संशय विशुद्ध ठरत नाही. .[६]

विशिष्ट विचारधारेसच बांधिलकी कायम ठेवण्यास चुकीची बौद्धिक दिशा आणि कॢप्त्या स्वीकारणे, कोणत्याही तर्कसंगत (रॅशनल) युक्तिवादास दुर्लक्षित करणे अथवा त्याला वळसा घालण्याचे कारस्थान करणाऱ्या संशयवादींच्या सहभागाचा प्रयत्न कोणत्याही तर्कसंगत चर्चेमुळे साध्य होत नाही. [७]

तर्कशास्त्र सुचविते की, अशा कारस्थानी सिद्धान्तवादी लोकांना(किंवा अशा प्रकारच्या धारणेकडे घसरलेल्या/झुकलेल्या लोकांना) बौद्धिक कृष्णविवरातून बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे असा की त्यांच्या विधानांच्या पद्धतीकडे त्यांचे लक्ष वेधणे, न की त्यांच्या विधानांच्या अर्थाकडे. (बहुतेक लोक नंतरचेच काम करतात).[८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.freerepublic.com/focus/f-news/900422/posts
  2. ^ Historians' Fallacies: Toward a Logic of Historical Thought या ग्रंथाचा 'Nate' यांचे समीक्षण गुडरीड्स डॉटकॉम संकेतस्थळावर दिनांक २९ जून २०१३ रोजी भाप्रवे रात्री १० वाजता जसे दिसले.
  3. ^ http://stephenlaw.blogspot.in/search/label/creationism
  4. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2013-05-14. 2013-01-14 रोजी पाहिले.
  5. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2013-05-14. 2013-01-14 रोजी पाहिले.
  6. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2013-05-14. 2013-01-14 रोजी पाहिले.
  7. ^ http://teampangloss.wordpress.com/2012/05/16/on-the-psychology-of-conspiracy-theorists-and-why-you-wont-win-an-argument-with-one/
  8. ^ http://teampangloss.wordpress.com/2012/05/16/on-the-psychology-of-conspiracy-theorists-and-why-you-wont-win-an-argument-with-one/