पुरुषत्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुरुषत्व किंवा मर्दानगी म्हणजे पुरुषांची ठरावीक वागणूक, भूमिका व वैशिष्टे ह्यांचा एकत्रित संच आहे. हा विचार मुळात पुरुषांशी व पुरुषी वागणुकीशी निगडित आहे. हा विचार सामाजिक आणि जैविक वस्तुस्थितीवरून निर्धारित होतो. स्त्री आणि पुरुष हे दोन्ही ह्या विचारांचे वाहक असतात किंवा असू शकतात. काही संस्कृतींमध्ये पुरुषत्व हे शौर्य, शक्ती, सामर्थ्य, इत्यादींचे प्रतीक मानले जाते. या संस्कृतीने रुबाबदार, बलदंड शरीरयष्टी असणे म्हणजे पुरुष अशी समाजात प्रतिमा निर्माण केली आहे.

शैक्षनिक क्षेत्रात, पुरुषत्व ही एक आंतरविद्याशाखीय संज्ञा असून त्यात पुरुष, पुरुषत्व, स्त्रीवाद, लिंगभाव, व राजकारण ह्यांचा समावेश असतो. पुरुषत्वाचा अभ्यास हा स्त्रीवादाशी निगडित आहे. पुरुषत्वामुळे पुरुषाला विशेष अधिकार प्राप्त होतात. आधुनिक काळात प्रसारमाध्यमांतून पुरुषत्वाचा विचार सातत्याने झिडकारला जात आहे. ह्या विषयाच्या अभ्यासात पुरुषांचे हक्क, स्त्रीवादी विचारसरणी, समलैंगिकता, मातृसत्ता, पितृसत्ता, अश्या वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासल्या जातात.