पुनर्गुंतवणूक
Jump to navigation
Jump to search
एखाद्या कंपनीला व्यवसायातून मिळालेला नफा ती कंपनी पुन्हा व्यवसायासाठी वापरू शकते, अथवा व्यवसायातून काढून घेऊ शकते.
पुन्हा व्यवसायासाठी वापरलेल्या नफ्याच्या हिश्शाला पुनर्गुंतवणूक असे म्हणतात.
उदाहरणार्थ: जर क्ष कंपनीस व्यवसायातून एखाद्या वर्षी १०० लक्ष निव्वळ नफा झाला, आणि त्यातील ४० लक्ष लाभांश म्हणून भागधारकांना देऊन ६० लक्ष व्यवसायासाठी वापरण्याचे संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ठरवले, तर क्ष कंपनीने ६०% पुनर्गुंतवणूक केली, असे म्हणण्यात येते.