Jump to content

पुणे नगर वाचन मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुणे नगर वाचन मंदिर हे पुणे शहरातले ग्रंथालय आणि वाचनालय आहे.

स्थापना व इतिहास[संपादन]

पुणे नगर वाचन मंदिराची स्थापना ७ फेब्रुवारी, इ.स. १८४८ रोजी झाली. या ग्रंथालयाचे आधीचे नाव दि पूना नेटिव्ह जनरल लायब्ररी असे होते. न्यायमूर्ती रानडे हे संस्थेचे पहिले अध्यक्ष होते.

पेशव्यांच्या बुधवार वाड्यात न्यायाधीश हेन्री ब्राऊन यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, कृष्णशास्त्री चिपळूणकर, प्रो. केरो लक्ष्मण छत्रे, दाजी नीलकंठ नगरकर, विष्णू परशुराम रानडे, सोन्या बापू मांडे, विष्णू मोरेश्वर भिडे यांच्या साहाय्याने या ग्रंथालयाची स्थापना केली. या लोकांनी श्रम आणि धन देऊन हे ग्रंथालय उभारले.[१]

ग्रंथालयाची इमारत
ग्रंथालयाची इमारत

ब्रिटीशांच्या काळात येथील जनतेला इंग्रजीचे शिक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली.[१]

इ.स. १३ मे १८७९ रोजी बुधवार वाड्याला आग लागली व वाडा भस्मसात झाला. ग्रंथालयाच्या चिटणीसांच्या घरी असलेल्या एका धारिणी खेरीज संपूर्ण ग्रंथालय भस्मसात झाले. याची नोंद पूना गॅॅझेटियरमध्ये आहे. नगरकर वाड्यानंतर लायब्ररी १५ एप्रिल १८८४ ते १ एप्रिल १८८९ पर्यंत दाणे आळीतील पुणे सार्वजनिक सभेच्या जागेत होती. नंतर १५ मे १८८२ रोजी वाचनालयासाठी लक्ष्मीपथावरील बेलबाग समोरील फडणीसांची मोकळी जागा ४००० रुपयांना विकत घेतली. १७ जुलै १८८२ श्री. रावसाहेब फडणीस यांच्या हस्ते पायाभरणीचा कार्यक्रम झाला. [२]

आधुनिकीकरण[संपादन]

संस्था कोहा या संगणकप्रणालीचा वापर करत आहे.

आजवर झालेले अध्यक्ष[संपादन]

स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक मान्यवर लोकांनी या ग्रंथालयाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. [३]

महादेव गोविंद रानडे १८९१-१९०१
रामकृष्ण गोपाळ भांडारकर १९०१-१९२५
काशिनाथ रामचंद्र गोडबोले १९२५-१९३७ (जून)
नरसिंह चिंतामण केळकर १९३७-१९३८
श्रीकृष्ण नीलकंठ चाफेकर १९३८-१९४०
वामन मोरेश्वर पोतदार १९४०-१९४१
नरहर गोविंद अभ्यंकर १९४२-१९४३
जनार्दन सखाराम करंदीकर १९४३-१९४५
गणेश नरहर श्रीगोंदकर १९४६-१९४७
माधव केशव सोमण १९१०-१९१५

सध्या श्री.मधुमिलिंद मेहेंदळे हे अध्यक्ष आहेत तर श्री.बाळासाहेब देशमुख हे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.[४]

शाखा[संपादन]

पाषाण, बिबवेवाडी, सिंहगड रोड, गणंजय सोसायटी, वारजे, कर्वे रोड, आयडियल सोसायटी इत्यादी ठिकाणी ग्रंथालयाच्या शाखा आहेत.[५]

या ग्रंथालयात सुमारे पन्नासहजार पुस्तके आहेत व तीन हजारहून अधिक नोंदणीकृत सदस्य आहेत.[६]

उपक्रम[संपादन]

'पुणे नगर वाचन मंदिर'तर्फे पुस्तक देवघेवीशिवाय इतरही अनेक उपक्रम चालविले जातात.

पुरस्कार[संपादन]

पुणे नगर वाचन मंदिर ही संस्था दर वर्षी काही साहित्यिकांना श्री.ज. जोशी, श्री.ना. बनहट्टी आदींच्या नावाचे पुरस्कार देते.

डिजिटायझेशन[संपादन]

पुणे नगर वाचन मंदिर तर्फे प्रताधिकारमुक्त पुस्तकांच्या डिजिटायझेशनचे काम हाती घेण्यात आले आहे. आजवर विकीमिडिया कॉमन्सवर एकहजार पेक्षा अधिक पुस्तके चढविण्यात आली आहेत.

पुस्तकांचे डिजीटायझेशन करताना

वाचक कट्टा[संपादन]

पुणे नगर वाचन मंदिर तर्फे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मुख्य शाखेमध्ये सकाळी १०.३० वाजता वाचक कट्टा आयोजित केला जातो. येथे प्रत्येक वेळी एक साहित्यिक व त्यांचे साहित्य यावर व्याख्यान होते.

बाह्य दुवे[संपादन]

पूरक माहितीसाठी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Pune Nagar Vachan Mandir". map.sahapedia.org (इंग्रजी भाषेत). 2024-03-17 रोजी पाहिले.
  2. ^ श्री, दीक्षित (७ फेब्रुवारी १९९८). दीडशे वर्षाचा इतिहास. पुणे २९: डॉ पुष्पा लिमये. pp. १०४.CS1 maint: location (link)
  3. ^ "Ex-Presidents – Pune Nagar Vachan Mandir" (इंग्रजी भाषेत). 2024-03-17 रोजी पाहिले.
  4. ^ "Present Executive Body – Pune Nagar Vachan Mandir" (इंग्रजी भाषेत). 2024-03-17 रोजी पाहिले.
  5. ^ गोष्ट पुण्याची - भाग ६८ मधील निवेदन.
  6. ^ "This 169-Year-Old Library Is A Meeting Point Of Literatists & Delivers Books At Your Doorstep!". LBB, Pune (इंग्रजी भाषेत). 2024-03-17 रोजी पाहिले.