पुडाची वडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुडाची वडी
पर्यायी नावे सांभारवडी
प्रकार नाश्ता
उगम भारत
मुख्य घटक कणीक, नारळ, कोथिंबीर, तिखट, मसाले

पुडाची वडी, ज्याला सांभारवडी असेही म्हणतात, हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ भागातील एक प्रसिद्ध नाश्ता आहे. याचे २ प्रकार आहेत. याचा गोड प्रकार विदर्भात, तर कोल्हापुरात तुम्हाला चटपटीत प्रकार मिळेल.

पुडाची वडिला कणीकचे बाह्य आवरण असते आणि त्यात सुकवलेले खोबरे, धणे, तिखट आणि भारतीय मसाल्यांचे मिश्रण भरलेले असते. हे खोल तळलेले आणि खूप कुरकुरीत आहे.