पी. रंगराजन कुमारमंगलम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फणिंद्रनाथ रंगराजन कुमारमंगलम (तामिळ: ரங்கராஜன் குமாரமங்கலம்)(मे १२, इ.स. १९५२- ऑगस्ट २३, इ.स. २०००) हे मे इ.स. १९९५ पर्यंत काँग्रेस पक्षाचे आणि डिसेंबर इ.स. १९९७ नंतर भारतीय जनता पक्षाचे नेते होते. ते मे इ.स. १९९५ ते डिसेंबर इ.स. १९९७ या काळात तिवारी काँग्रेसचे सदस्य होते. ते इ.स. १९८४, इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून तामिळनाडू राज्यातील सेलम तर इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून तामिळनाडू राज्यातील तिरूचिरापल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९९८ ते इ.स. २००० या काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात उर्जामंत्री आणि संसदीय कार्यमंत्री होते.