Jump to content

पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट (हैदराबाद)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट (हैदराबाद)
राजकीय पक्ष
देशभारत संपादन

पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट ही हैदराबाद संस्थानातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जनआघाडी होती.

निवडणूका

[संपादन]

हैदराबादमधील एकूण २५ खासदार जागांपैकी पक्षाने पहिल्या लोकसभेच्या कार्यकाळात ७ खासदार जागा जिंकल्या. या सात खासदारांमध्ये तेलंगणा बंडखोरी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती होत्या. दुसऱ्या लोकसभेत पक्षाचे २ खासदार होते आणि ह्या १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना ०.८७% मते मिळाली होती.[]

१९५२ च्या हैदराबाद राज्य विधानसभेच्या निवडणुकीत, पक्षाने विधानसभेच्या १७५ जागांपैकी ७७ जागा लढवल्या. पक्षाला २०.७६% मते मिळाली आणि ४२ जागा जिंकल्या.[] १९५७ च्या आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत, पक्षाला २५.७३% मते मिळाली आणि २२ जागा जिंकल्या.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ECI 1957
  2. "Statistical Report on General Election, 1951 : To the Legislative Assembly of Hyderabad" (PDF). Election Commission of India. 6 October 2010 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-10-14 रोजी पाहिले.
  3. "Statistical Report on General Election, 1957 : To the Legislative Assembly of Andhra Pradesh" (PDF). Election Commission of India. July 11, 2015 रोजी पाहिले.