Jump to content

पीएम नरेंद्र मोदी (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पीएम नरेंद्र मोदी (चित्रपट)
संगीत
देश India
भाषा Hindi
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}



पीएम नरेंद्र मोदी हा २०१९ चा हिंदी भाषेतील चरित्रात्मक नाट्यपट आहे जो ओमंग कुमार दिग्दर्शित केला आहे आणि अनिरुद्ध चावला आणि विवेक ओबेरॉय यांनी लिहिलेला आहे. लेजेंड स्टुडिओजच्या बॅनरखाली सुरेश ओबेरॉय, संदिप सिंग, आनंद पंडित, आचार्य मनीष यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे कथानक भारताचे १४ वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आहे.

गाणी हितेश मोडक आणि शशी-खुशी यांनी संगीतबद्ध केली होती. चित्रपटातील गीतांचे श्रेय जावेद अख्तर, समीर, अभिेंद्र उपाध्याय, इर्शाद कामिल, पॅरी जी. आणि लवराज यांना देण्यात आले होते. जावेद अख्तर यांनी नंतर पुष्टी केली की त्यांनी चित्रपटात कोणतीही गाणी लिहिलेली नाहीत आणि समीरसोबत त्यांची नावे क्रेडिट्समध्ये पाहून त्यांना धक्का बसला. हा चित्रपट २४ मे २०१९ रोजी भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षकांनी फटकारले आणि ओबेरॉयच्या अभिनयावर खूप टीका झाली. भारतात २८.५१ कोटींची कमाई करून हा चित्रपट पूर्णपणे अपयशी ठरला.

संदर्भ

[संपादन]