पियू (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पियू
पियू

पियू, पिहू, मिरिंगी, रिंगी किंवा पाणमोर (इंग्लिश:Phessant-tailed Jacana; हिंदी:जलकपोत, जलमज्जुर, जलमंजोर, पिह, पिही, पिहुया, पिहो, मीवा) हा एक पक्षी आहे.

आकाराने अंदाजे तित्तिराएवढा. विणीच्या हंगामात उडताना त्याची पिसे पंढरी व तपकिरी पिंगट दिसतात. शेपटी लांब, टोकदार व कोयत्याच्या आकाराची. विणीच्या हंगामानंतर हे पक्षी पिवळट उदी व पांढरे दिसतात. छातीवर काळा गळपट्टा. टोकदार व कोयत्याच्या आकाराची शेपटी झडते. कोळ्याच्या पायांसारखी लांबलचक बोटे. नर-मादी दिसायला सारखे. एकटे किंवा थव्याने आढळून येतात.

वितरण[संपादन]

भारतीय उपखंड आणि श्रीलंकेत निवासी. स्थानिक स्थलांतर करणारे. हिमालयात १५०० मीटर उंचीपर्यंत आढळतात. हिवाळ्यात खाली पठारी भागात उतरतात. जून ते सप्टेंबर या काळात वीण.

निवासस्थाने[संपादन]

दलदली आणि कमळवने असलेली तळी.

संदर्भ[संपादन]

पक्षिकोश मारुती चितमपल्ली