Jump to content

पिंपळगाव (खडकी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिंपळगाव (तर्फे महाळुंगे) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील, पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात वसलेले घोड नदीच्या काठावरचे एक गाव आहे.[ दुजोरा हवा] गावची लोकसंख्या किमान सहा हजाराच्या आसपास आहे.[ संदर्भ हवा ]

स्थान

[संपादन]

पिंपळगाव तर्फे महाळुंगे हे गाव मंचर पासून 5 कि.मी पुर्वेकडे वसलेले आहे. ,

गावाच्या चतुःसीमा

[संपादन]

पुर्वेस :- निरगुडसर पश्चिमेस:- चांडोली, मंचर उत्तरेस:- खडकी दक्षिणेस:- अवसरी खुर्द

गाव आणि शिवार

[संपादन]

गावचे क्षेत्रफळ 696.81 हेक्टर पैकी गायरान 34.62 हेक्टर व लागवडीलायक क्षेत्र 602.38 हेक्टर आहे.ग्रामदैवत मुक्तादेवी मंदिर, श्रीराम मंदिर, श्री हनुमान मंदिर, आणि श्री कमलजादेवी अशी अनेक देव-देवतांची मंदिरे आहेत.


ग्रामपंचायत

[संपादन]

गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत सन 1953 साली स्थापन झाली. ग्रामपंचायतीमध्ये एकूण 12 सदस्य आहेत. गावाला आजपर्यंत अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.

नद्या, नाले, तलाव

[संपादन]

पिंपळगाव तर्फे महाळुंगे गावाला पश्चिम पुर्व वाहणारी घोडनदी लाभलेली आहे. शेजारील गावाला लाभलेल्या भव्य तटामुळे नदीचा परिसर शोभिवंत वाटतो.

येण्या-जाण्याचे मार्ग

[संपादन]

मंचरमार्गे ->पिराचा मळा->पिंपळगाव तर्फे महाळुंगे अवसरीमार्गे-> लिंबाचा मळा->पिंपळगाव तर्फे महाळुंगे खडकीमार्गे-> पुल ओलांडुन->पिंपळगाव तर्फे महाळुंगे निरगुडसरमार्गे-> गव्हाळीमळा->पिंपळगाव तर्फे महाळुंगे