पावागढ
Jump to navigation
Jump to search
पावागढ हा गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील किल्ल्यावजा डोंगर आहे. अरवल्ली पर्वतरांगेच्या टोकाशी असलेला हा डोंगर ८२२ मीटर उंचीचा आहे. डोंगरावर किल्ला असून शिखरावर कालीमातेचे मंदिर आहे. या डोंगराच्या पायथ्याशी चांपानेर हे प्राचीन शहर आहे.
पावागढवर अनेक तळी आहेत तसेच साधारण अर्ध्या चढावावर (४९० मी) असलेल्या पठारावर शेतीकरण्यालायक जमीनही आहे. सोळाव्या शतकात सुलतान महमूद बेगड्याने चांपानेरचा पाडाव करुन किल्ला काबीज करेपर्यंत पावागढ हा अभेद्य किल्ला मानला जात असत. मुझफ्फरी सुलतानांच्या सत्तेखाली काही दशके राहिल्यावर पावागढ मुघलांनी घेतला व नंतर हा भारतात सामील झाला.