पाणी परीक्षण
पाणी तपासणी
[संपादन]सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या अयोग्य आणि समस्यायुक्त पाण्याचा पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. यासाठी पाण्याचे परीक्षण करून योग्यतेनुसार पाण्याचा सिंचनासाठी वापर करावा. पुढील गोष्टी लक्षात घेऊन सिंचनाच्या पाण्याची तपासणी करावी. पाणी चवीस खारवट किंवा मचूळ वाटत असल्यास, पाण्याचा सिंचनासाठी वापर केलेल्या शेतातील जमिनीच्या पृष्ठभागावर क्षारांचा पांढरा थर दिसून आल्यास, पीक उगवणीस अडथळा होताना दिसून आल्यास किंवा उगवलेल्या पिकांचे शेंडे करपताना दिसून आल्यास, जमीन चोपण चिबड होऊन पृष्ठभागावर पाणी थांबत असल्यास, जमिनीवर चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवत असल्यास पाण्याचा नमुना परीक्षणासाठी द्यावा. निरनिराळ्या सिंचन साधनांमधून घेतलेला पाण्याचा नमुना प्रा तिनिधिक असावयास पाहिजे.
पाण्याचा नमुना कसा घ्यावा
[संपादन]तपासणीसाठी सुमारे अर्ध्या लिटरच्या बाटलीत (बाटली १०-१५ वेळा त्याच पाण्याने धुऊन) पाणी भरून २४ तासांच्या आत ते आरोग्य प्रयोगशाळेत पाठवावे लागते.यासाठी पक्के बूच असलेली बाटली निवडावी.
पाण्याची रासायनिक व भौतिक गुणधर्म तपासणी करण्यासाठी किट
[संपादन]पिण्याच्या पाण्यामध्ये अनेक क्षार व रसायने असू शकतात. पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्याची तपासणी/ परीक्षण करावी/करावे लागते. या किटचा वापर करून पुढील घटकांसाठी तपासणी करता येते.
- आम्ल- विम्ल निर्देशांक (सामू) – pH
- आयर्न (लोह) – Iron
- क्लोराईड – Chloride
- फ्लुराईड – Fluoride
- नायट्रेट– Nitrate
- टोटल हार्डनेस -Total Hardness
- टर्बीडीटी -गढूळपणा – Turbidity
पाण्याचे परीक्षण करण्याचे चरण
[संपादन]पाणी तपासणीच्या बाटलीवर शेतकऱ्याचे नाव व पत्ता, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख व थोडक्यात पाण्याबाबत शेतकऱ्याचे अनुभव लिहिलेले लेबल बाटलीला चिकटवून प्रयोगशाळेत पाठवावा. याबाबत अधिक माहिती पुढील क्रमांकावर संपर्क साधल्यास मिळू शकेल. अमेरिकेतील सर्व सुविधांमध्ये सांडपाणी पृष्ठभागावर सोडले जाते (उदा. नद्या, तलाव किंवा किनाऱ्यावरील पाण्यांसाठी) राष्ट्रीय प्रदूषक डिस्चार्ज एलिमिनेशन सिस्टम अंतर्गत ईपीए आणि राज्य एजन्सीद्वारे प्रशासित स्वच्छ पाणी अधिनियम कार्यक्रमांतर्गत परवानगी घेणे आवश्यक आहे.संरक्षित सुविधांमध्ये सांडपाणी समाविष्ट आहे. ट्रीटमेंट प्लांट्स, औद्योगिक आणि व्यावसायिक वनस्पती, लष्करी तळ आणि इतर सुविधा बऱ्याच परवानग्यांसाठी नियमितपणे सांडपाणी नमुने गोळा करणे आणि परवान्याच्या आवश्यकतेचे पालन करण्यासाठी त्यांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे आणि परीणामांचा अहवाल ईपीए किंवा राज्य एजन्सीला द्यावा. पॅथोजेनिक बॅक्टेरियांची उपस्थिती / अनुपस्थिती चाचणी समाविष्ट करणारे विशेष जीवाणू चाचणी पॅकेज. आपल्या पाण्याच्या स्त्रोताची सामान्य सामर्थ्यता आपण तपासू इच्छित असल्यास या पॅकेजची शिफारस केली आहे, शिवाय आपल्याला गोड गंध, पुनरावृत्ती कोलिफॉर्म पॉझिटिव्ह, चव समस्या किंवा गंधकयुक्त गंध देखील येत आहेत.
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ "Water testing". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-25.
- ^ "Water Research Center - Water Testing Drinking Water Private Well Water". water-research.net. 2020-02-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-31 रोजी पाहिले.