पाणटिवळा (पक्षी)
Appearance
पाणटिवळा, आरा चाचू खग, घाटी टिवळा, (इंग्लिश:Blacktailed Godwit; हिंदी:गुदेरा, गुडेरा, गौरिया, जंगराल खग, बडा चाहा, मलगुझा) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
आकाराने तित्तिरापेक्षा मोठा असतो. बदामी उदी रंगाचा. त्यावर चित्रविचित्र रंगाचे ठिपके. जलचर पक्षी. लहान कोरल व कोरलचा भाऊबंदच. चोच बारीक, सरळ व किंचित वर वाकलेली. उडताना पांढऱ्या शेपटीचे काळे टोक दिसते. तसेच पंखांवर पांढरी पट्टी. उन्हाळ्यात डोके, मान आणि छाती गंजासारखे तांबडी. नर-मादी दिसायला सारखेच. घोळक्याने किंवा मोठ्या थव्याने आढळून येतात.
वितरण
[संपादन]ईशान्य भारत आणि पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, ब्रम्हदेश ह्या भागांत हिवाळी पाहुणे. मालदीव बेटांत भाटले पक्षी. भारत द्विपकल्पात दक्षिणेकडे त्यांचे प्रमाण कमीकमी होत जाते. पॅलिआर्क्टिक भागात वीण.
निवासस्थाने
[संपादन]समुद्रकिनारे, चिखलाणी, दलदली तसेच अनेकदा भातशेतीचा प्रदेश.
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली