पाखर संकुल (सोलापूर)
Appearance
पाखर संकुल ही महाराष्ट्राच्या सोलापूर शहरातील लहान मुलांचे संगोपन करणारी संस्था आहे.
या संस्थेची सुरुवात धर्मादाय आयुक्त, सहाय्यक आयुक्त, महिला व बालविकास अधिकारी यांची विधिवत अनुमती घेऊन ८ मे २००३ मध्ये एका बाळाच्या नामकरण संस्काराने सुरू झाली. ही संस्था शून्य ते सहा वयोगटातील बालकांचा सांभाळ करते. शहर तसेच ग्रामीण भागात झोपडपट्टी तसेच वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या आणि अनाथ मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षण आणि संस्कार देण्याचा प्रयत्न करते. या संस्थेत शुभसंस्कार वर्ग, बाल संगोपन आणि विद्यादायिनी योजना, किशोर-किशोरी प्रकल्प, कलाकौशल्य प्रशिक्षण वर्ग, उन्मेष प्रकल्प विध्याकोश, कुटुंब सल्ला केंद्र, महिला समुपदेशन केंद्र, हितगुज केंद्र यासारखे कार्यक्रम घेतले जातात.