पाकिस्तान रेल्वे
Appearance
लाहोर येथील पाकिस्तान रेल्वेचे मुख्यालय | |
प्रकार | सरकारी उद्योग |
---|---|
उद्योग क्षेत्र | रेल्वे वाहतूक |
स्थापना | इ.स. १८६१ |
मुख्यालय | लाहोर, पाकिस्तान |
सेवा | प्रवासी वाहतूक, माल वाहतूक, पार्सल सेवा |
महसूली उत्पन्न | ५,४५९ कोटी पाकिस्तानी रुपये |
कर्मचारी | ७२,०७८ |
पालक कंपनी | पाकिस्तान रेल्वे मंत्रालय |
विभाग | ६ |
पोटकंपनी | १ |
संकेतस्थळ | https://www.pakrail.gov.pk |
पाकिस्तान रेल्वे (उर्दू: پاکستان ریلویز ) ही पाकिस्तान देशाची राष्ट्रीय रेल्वे कंपनी आहे. एकूण ७,७९१ किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळे असलेली पाकिस्तान रेल्वे देशामध्ये प्रवासी व मालवाहतूक पुरवते. आजच्या घडीला पाकिस्तानमधील एकूण वाहतूकीपैकी केवळ ४ टक्के वाहतूक पाकिस्तान रेल्वेद्वारे करण्यात येते. २०१८-१९ साली सुमारे ७ कोटी प्रवाशांनी पाकिस्तान रेल्वेमधून प्रवास केला.
प्रमुख्याने ब्रॉड गेजवर धावणाऱ्या पाकिस्तान रेल्वेचे ५ प्रमुख मार्ग असून दक्षिणेकडील कराचीला लाहोर व रावळपिंडीमार्गे पेशावरसोबत जोडणारा मार्ग देशातील सर्वाधिक वर्दळीचा रेल्वेमार्ग आहे. आजच्या घडीला सर्व रेल्वे वाहतूक डिझेल इंजिनांद्वारेच करण्यात येते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2021-02-01 at the Wayback Machine.