पांगिरा (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पांगिरा हा विश्वास पाटील यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारीत असलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या हमी भावाचा प्रश्न हाताळला गेला आहे. तिसऱ्या नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या चित्रपटाची निवड झाली होती. याचे दिग्दर्शन राजीव पाटील यांनी केलेले आहे.