पश्चिम दिशा
Appearance
(पश्चिम या पानावरून पुनर्निर्देशित)
पश्चिम ही चार प्रमुख दिशांपैकी एक आहे. पूर्व ही सूर्य उगवण्याची दिशा आहे, तर पश्चिम ही सूर्य मावळण्याची दिशा आहे. मराठीत पश्चिम दिशेला ’मावळत’ असाही शब्द आहे. ही दिशा पूर्व दिशेच्या विरुद्ध बाजूला आणि दक्षिण-उत्तर दिशांना लंबरूप असते. ३६० अंशाच्या होकायंत्रावर ही दिशा २७० अंशाच्या कोनात असते.
भारताच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या लोकांना किंवा त्यांच्या संस्कृतीला भारतीय भाषांमध्ये पाश्चात्त्य किंवा पाश्चिमात्य अशी विशेषणे वापरतात.
उजवीकडच्या चित्रातले ’पश्चिम’ आणि 'नैर्ऋत्य' हे शब्द चुकीचे लिहिले आहेत.