पळसवडे
पळसवडे हे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील एक गाव आहे. गावाचा इतिहास हा जास्तीत जास्त २५० वर्षापासून ज्ञात आहे. या गावाची लोकसंख्या ५०० पेक्षा (२००९) कमी आहे आणि मतदार संख्या १६६ (लोकसभा-२००९) आहे. मुळात हे गाव खेडवळ भागातील असल्याने या गावाचा विकास फारसा झालेला नाही. १९९७नंतर या गावाचा विकास होण्यास सुरुवात झाली. गावातील काही राजकारणी लोकांमुळे मतदारांची तीन गटांत विभागणी झालेली दिसून येते.
गावाचे स्थान
[संपादन]सातारा - कोल्हापूर महामार्गावरील कराड येथून शेडगेवाडीमार्गे गावासाठी जाता येते. पळसवडे गावाच्या उत्तरेला खेडे, पूर्वेला विद्रुकवाडी- विरळे - मालेवाडी गोंडोली - कोकरूड अशी गावे आहेत, दक्षिणेला डोंगराळ प्रदेश - व नंतर परळे (आनुस खोरा), तर पश्चिमेला मालगाव - कांडवण ही गावे आहेत.
गावाचा पत्ता - पळसवडे, पोस्ट- विरळे. तालुका - शाहूवाडी. जिल्हा - कोल्हापूर. राज्य - महाराष्ट्र.
पळसवडे गावातील काही स्थळे
[संपादन]पळसवडे गावामध्ये विठलाईदेवीचे देऊळ, कानसा नदी व डोंगराळ भागातील जंगले असून गावाजवळ डोंगराध्ये वाघाची गुहा पहायला मिळते.
पळसवडे गावातील सण
[संपादन]होळीचा सण - शिमगा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव वगैरे.
या सर्वांपैकी शिमग्याचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केला जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |