Jump to content

पर्व (मराठी कादंबरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पर्व
लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा
अनुवादक सौ. उमा कुलकर्णी
भाषा मूळ: कन्नड
अनुवाद: मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रथमावृत्ती जानेवारी, १९९१
मुखपृष्ठकार अनिल उपळेकर
विषय महाभारत
पृष्ठसंख्या ७०४
आय.एस.बी.एन. ISBN 81-7161-299-7

पर्व ही एक मराठी अनुवादित कादंबरी आहे. एस.एल. भैरप्पा यांनी मूळ कन्नड भाषेत लिहिलेल्या त्याच नावाच्या कादंबरीचे उमा कुलकर्णी यांनी मराठीत याचे भाषांतर केले आहे. भैरप्पांनी या कादंबरीत महाभारताच्या कथानकाचा कल्पनाविस्तार मांडला आहे.

लेखकाच्या सर्व कादंबऱ्यांपैकी समीक्षकांकडून सर्वात प्रशंसनीय म्हणून ही कादंबरी ओळखतात. महाभारताच्या महाकाव्यातील सामाजिक रचना, मूल्ये आणि मृत्यूचे वर्णन अतिशय प्रभावीपणे लेखकाने केले आहे. भैरप्पा या कादंबरीतील रूपकांच्या माध्यमातून समाजशास्त्रीय आणि मानवशास्त्रीय कोनातून महाभारताची पुनर्रचना करतात.

संदर्भ

[संपादन]