Jump to content

पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पर्णालपर्वतग्रहणाख्यान हा एक संस्कृत मधील काव्यग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना जयराम पिंड्ये यांनी केली. यातील पर्णाल म्हणजे पन्हाळा किल्ला होय. शिवाजी महाराजांनी इ.स.१६७३ मध्ये हा किल्ला दुसऱ्या वेळेस जिंकला होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला कसा जिंकला, या विषयावरच हा ग्रंथ आधारित आहे. पन्हाळा किल्ला जिंकल्यापासून ते बहलुलखान विरुद्ध प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांच्या संघर्षापर्यंतचा वृत्तांत या ग्रंथात आलेला आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर प्रकाश टाकणारा महत्वपूर्ण काव्यग्रंथ म्हणून या ग्रंथाकडे पाहावे लागते. मराठ्यांच्या इतिहासातील हे एक समकालीन संस्कृत साधन आहे.

संदर्भयादी

[संपादन]