पर्जन्यवृक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

यालाच रेन ट्री किंवा विलायती शिरीष असे म्हणतात. या झाडाचे मूळ स्थान म्हणजे ब्राझील, पेरू, मेक्सिको हे उष्णकटिबंधीय देश. या झाडाची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडांत या वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली आहे. हा वृक्ष वर्षभर हिरवा दिसतो. झाडाची उंची १५ ते २५ मीटर इतकी असू शकते. हे झाड विशिष्ट उंचीपर्यंत सरळ वाढते. त्यानंतर ह्याच्या फांद्या छत्रीसारख्या पसरतात. झाडाची पाने संयुक्त प्रकाराची असतात.