धोबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(परीट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

परीट (किंवा धोबी) हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. एकूण बलुतेदारांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाच्या बलुतेदारांत गणला जातो. ह्यांचा धर्म हिंदू असून ह्या समाजात खंडोबा, मरीआई, येडाबाई, भवानी देवी, भैरोबा, म्हसोबा या दैवतांची पूजा मोठ्या प्रमाणात होते. परीट हा एक मेहनती बलुतेदार आहे. त्याला वर्षभर काम असायचे. परीट समाज हा आक्रमक लढवय्या व रांगडा समाज आहे. हिंदू वर्णव्यवस्थेत यांना खालच मानले जात असे . कुस्ती खेळण्यात हा समाज पटाईत होता. धोबीपछाड हा डाव परिटानीच शोधला आहे. घरोघरीचे कपडे गोळा करून त्यांवर बिब्याच्या तेलाने खुणा करून आणि ते धुऊन, इस्त्री करून घरोघर पोचवणे हे परटाचे काम. विशेषत: कुणब्यांच्या व गावातील इतर लोकांचे घरी, लग्नाच्या वा सोयरसुतकाच्या वेळी कपडे धुण्याचे व कपड्यांना इस्तरी करण्याचे काम परीट करीत असे. यासोबतच लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर चांदवा(चादरी) धरणे, विहिणींसमोर पायघड्या टाकणे ही कामेसुद्धा परटाकडे होती .