Jump to content

परवेझ हूडभॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(परवेझ हुदभाई या पानावरून पुनर्निर्देशित)
परवेझ अमीरअली हुदभाई

जन्म ११ जुलै १९५०
कराची
नागरिकत्व पाकिस्तानी
राष्ट्रीयत्व पाकिस्तानी
प्रशिक्षण मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी
वडील अमीरअली

परवेझ अमीरअली हुदभाई (जन्म : ११ जुलै १९५० - हयात) हे पाकिस्तानी अणुवैज्ञानिक, पदार्थवैज्ञानिक, गणितज्ञ तसेच विचारवंत आहेत. हुदभाई हे पाकिस्तानातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या आणि इहवादाच्या पुरस्काराच्या चळवळींतील कार्यकर्तेही आहेत.

पूर्ववृत्त

[संपादन]

परवेझ हूदभाई ह्यांचा जन्म पाकिस्तानातील कराची येथे झाला[].

शिक्षण

[संपादन]

हुदभाई ह्यांचे शालेय शिक्षण कराची ग्रामर स्कूल ह्या ठिकाणी झाले. १९७३मध्ये अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून त्यांनी गणित, विद्युत अभियांत्रिकी ह्या विषयांतून त्यांनी विज्ञान-स्नातक (बॅचलर्स ऑफ सायन्स) आणि घनावस्था-भौतिकी ह्या विषयातून विज्ञान-अधिस्नातक (मास्टर्स ऑफ सायन्स) ह्या पदव्या मिळवल्या. ह्याच शिक्षणसंस्थेतून त्यांनी १९७८ ह्या वर्षी पुंजयामिक भौतिकी ह्या विषयातून पीएचडी पदवी संपादित केली. .

व्यावसायिक पदे

[संपादन]

१९७३-२०१० ह्या कालावधीत हुदभाई ह्यांनी पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील कायदे आझम विद्यापीठात प्रथमतः पदार्थविज्ञानाचे व्याख्याते आणि शेवटी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. २०१०-२०१२ ह्या कालावधीत लाहोर येथील लम्स (LUMS) विद्यापीठात पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. २०१२-२०२० ह्या कालावधीत ख्रिश्चन कॉलेज विद्यापीठ, लाहोर येथे ते पदार्थविज्ञान आणि गणित ह्या विषयांचे विख्यात प्राध्यापक (डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर) ह्या पदावर कार्यरत होते.[]

लेखन

[संपादन]

परवेझ हुदभाई ह्यांनी विविध नियतकालिकांतून विपुल लेखन केले असून त्यांची काही पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत[].

  • इस्लाम ॲण्ड सायन्स : रिलिजस ऑर्थोडॉक्सी ॲण्ड दि बॅटल फॉर रॅशनॅलिटी. (१९९१); झेड बुक्स लि.; लंडन आणि न्यू जर्सी.

संदर्भ

[संपादन]

संदर्भसूची

[संपादन]
  • हुदभाई, परवेझ (२०२१). CURRICULUM VITAE for PERVEZ AMIRALI HOODBHOY (PDF). https://eacpe.org/ (इंग्लिश भाषेत). १३ एप्रिल २०२१ रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]