परवेझ हूडभॉय
परवेझ अमीरअली हुदभाई | |
जन्म | ११ जुलै १९५० कराची |
नागरिकत्व | पाकिस्तानी |
राष्ट्रीयत्व | पाकिस्तानी |
प्रशिक्षण | मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी |
वडील | अमीरअली |
परवेझ अमीरअली हुदभाई (जन्म : ११ जुलै १९५० - हयात) हे पाकिस्तानी अणुवैज्ञानिक, पदार्थवैज्ञानिक, गणितज्ञ तसेच विचारवंत आहेत. हुदभाई हे पाकिस्तानातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या आणि इहवादाच्या पुरस्काराच्या चळवळींतील कार्यकर्तेही आहेत.
पूर्ववृत्त
[संपादन]परवेझ हूदभाई ह्यांचा जन्म पाकिस्तानातील कराची येथे झाला[१].
शिक्षण
[संपादन]हुदभाई ह्यांचे शालेय शिक्षण कराची ग्रामर स्कूल ह्या ठिकाणी झाले. १९७३मध्ये अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून त्यांनी गणित, विद्युत अभियांत्रिकी ह्या विषयांतून त्यांनी विज्ञान-स्नातक (बॅचलर्स ऑफ सायन्स) आणि घनावस्था-भौतिकी ह्या विषयातून विज्ञान-अधिस्नातक (मास्टर्स ऑफ सायन्स) ह्या पदव्या मिळवल्या. ह्याच शिक्षणसंस्थेतून त्यांनी १९७८ ह्या वर्षी पुंजयामिक भौतिकी ह्या विषयातून पीएचडी पदवी संपादित केली. .
व्यावसायिक पदे
[संपादन]१९७३-२०१० ह्या कालावधीत हुदभाई ह्यांनी पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील कायदे आझम विद्यापीठात प्रथमतः पदार्थविज्ञानाचे व्याख्याते आणि शेवटी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. २०१०-२०१२ ह्या कालावधीत लाहोर येथील लम्स (LUMS) विद्यापीठात पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. २०१२-२०२० ह्या कालावधीत ख्रिश्चन कॉलेज विद्यापीठ, लाहोर येथे ते पदार्थविज्ञान आणि गणित ह्या विषयांचे विख्यात प्राध्यापक (डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर) ह्या पदावर कार्यरत होते.[१]
लेखन
[संपादन]परवेझ हुदभाई ह्यांनी विविध नियतकालिकांतून विपुल लेखन केले असून त्यांची काही पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत[२].
- इस्लाम ॲण्ड सायन्स : रिलिजस ऑर्थोडॉक्सी ॲण्ड दि बॅटल फॉर रॅशनॅलिटी. (१९९१); झेड बुक्स लि.; लंडन आणि न्यू जर्सी.
संदर्भ
[संपादन]संदर्भसूची
[संपादन]- हुदभाई, परवेझ (२०२१). CURRICULUM VITAE for PERVEZ AMIRALI HOODBHOY (PDF). https://eacpe.org/ (इंग्लिश भाषेत). १३ एप्रिल २०२१ रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
- परवेझ हुदभाई ह्यांचे लेखन. https://eacpe.org/ (इंग्लिश भाषेत). १३ एप्रिल २०२१ रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)