परमहंस सभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

परमहंस सभा दादोबा पांडुरंग यांनी ३१जुलै, १८४९ मध्ये मुंबई येथे सुरू केली.

या सभेच्या स्थापनेत चव्हाण, जयकर या मंडळींची मदत झाली व अध्यक्ष राम बाळकृष्ण जयकर होते.

परमहंस सभा ही गुप्त सभा होती तिचे काम गुप्तपणे चाले. पण फार काळ ही चालू शकली नाही कारण सभेच्या सदस्यांची यादी चोरीला गेली त्यामुळे समाजाच्या भीतीने तिचे काम थांबले.