परमहंस सभा
Appearance
परमहंस सभा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ३१ जुलै, १८४९ मध्ये मुंबई येथे सुरू केली.
या सभेच्या स्थापनेत भिकोबादादा चव्हाण, रामचंद्र बाळकृष्ण जयकर या मंडळींची मदत झाली व अध्यक्ष राम बाळकृष्ण जयकर होते.
परमहंस सभा ही गुप्त सभा होती. समाजावर ख्रिस्ती धर्माचा प्रभाव होता. तिचे काम गुप्तपणे चाले. पण फार काळ ही चालू शकली नाही कारण सभेच्या सदस्यांची यादी चोरीला गेली आणि वर्तमानपत्रात प्रकाशित झाली. त्यामुळे समाजाच्या भीतीने तिचे काम थांबले.
परमहंस सभेचे संस्थापक: दुर्गादास मंच्छाराम व दादोबा पांडुरंग
सभेचे अध्यक्ष : राम बाळकृष्ण जयकर
सदस्य
[संपादन]- राम बाळकृष्ण जयकर
- भिकोबादादा चव्हाण
- लक्ष्मणशास्त्री हळबे
- आत्माराम पांडुरंग तर्खडकर
- दादोबा पांडुरंग
- मोरोबा विनोबा
- मदन श्रीकृष्ण
सभेचे तत्त्वज्ञान
[संपादन]- जातिभेद मानू नये.
- मूर्तिपूजा करू नये.
- एकेश्र्वरवादाचा पुरस्कार करावा. फक्त एकाच ईश्र्वराची भक्ती करावी.
- सर्वांशी बंधुत्वाच्या भावनेने वागावे.
- स्पृश्यास्पृश्य भेद पाळू नये.
- स्त्रियांना पुनर्विवाह करू द्यावेत.
- स्त्रिया, महारमांगादी लोकांना विद्या द्यावी.
- मनुष्यांची गुणवत्ता त्याच्या कुळावरून नव्हे तर गुणांवरून ठरवावी.
- विवेकास अनुसरून कर्म करावे.
एकूणच दादोबांची वैचारिक बैठक राजा राममोहन रॉयशी जुळणारी होती.