पपनस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गुलाबी पपनस
पपनसाचे झाड
पपनसाचे फूल

पपनस ही एक लिंबू वर्गीय वनस्पती आहे.रूटेसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सिट्रस मॅक्झिमा असे आहे. याला इंग्रजीमध्ये पोमेलो असे म्हणतात.

पपनसाचे झाड ५ -१० मीटर उंच वाढते. पानांचा रंग गडद हिरवा असतो. पपनसाची फुले पांढऱ्या रंगाची असतात. झाडाला फुलांचे गुच्छ लागतात. फळे मोठ्या चेंडूच्या आकाराची,हिरव्या सालीची, १० ते ३० सेंमी व्यासाची असतात. वजन सुमारे १-२ किलोग्रॅम भरते. फळे पिकू लागली की साल पिवळ्या रंगाची होते. फळ सोलले की आत पांढऱ्या रंगाचे बरेच जाड भुसभुशीत आवरण असते. ते सोलल्यावर आत मोसंब्याप्रमाणे फोडींची रचना असते. पांढरा गर किंवा वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी रंगाचा गर असलेल्या पपनसाच्या दोन जाती आहेत. फळ कच्चे असेल तर गर बराच कडवट लागतो. फळ पिकल्यावर हा कडवटपणा कमी होतो. बियांपासून रोपे तयार करता येतात.

पपनसाचे फळ

आढळ[संपादन]

महाराष्ट्रातील कोकणात विशेषत: ही झाडे जास्त प्रमाणात आहेत.

स्थानिक नाव[संपादन]

पपनसाला 'चकुत्र' 'बंपर' आणि 'चकोत्रा' अशा स्थानिक नावानी ओळखले जाते.

वापर[संपादन]

पपनस ही एक औषधी वनस्पती आहे. पपनसाचा मगज पौष्टीक तसाच ज्वरनाशी आहे. पपनसाचा मगज साखर घालून खातात. त्यात पोटॅशियम,कॅल्शियम आणि 'क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते. त्यापासून मुरंबे,मार्मालेड असे पदार्थ बनवतात.फुलांपासून अत्तर तयार करतात. लाकूड थोडेसे कठीण असते.त्यापासून अवजारांच्या मुठी तयार करतात.

गणेशोत्सवात गणपतीला पपनसाचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]संदर्भ :कुमार विश्वकोश महाराष्ट्र राज्य

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत