पनाबाका लक्ष्मी
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर ६, इ.स. १९५८ नेल्लोर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
डॉ. पनाबाका लक्ष्मी (जन्म ६ ऑक्टोबर १९५८) एक भारतीय राजकारणी आणि माजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री (२००४-०९) आणि केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री (२००९-१४) आहेत. त्या आंध्र प्रदेशातील बापटला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या आणि एकत्रित आंध्र प्रदेशातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्या होत्या. आता त्या तेलुगु देसम पार्टीचा (टीडीपी) भाग आहे. [१]
वैयक्तिक जीवन
[संपादन]डॉ. पनाबाका लक्ष्मी यांचा जन्म कावली, नेल्लोर (आंध्र प्रदेश) येथे झाला आणि डॉ. पी. कृष्णैया यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुली आहेत. त्यांनी आंध्र विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासनात एमए पूर्ण केले आहे. [२]
कारकीर्द
[संपादन]त्या ११व्या, १२व्या आणि १४व्या लोकसभेसाठी नेल्लोरमधून आणि १५व्या लोकसभेसाठी बापटलामधून निवडून आल्या होत्या. त्या यूपीए सरकारमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री (२००४-०९),पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री (२०१२-१४) आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री (२००९-१४) मध्ये राज्यमंत्री होत्या. [३]
वाय.एस.आर.काँग्रेसच्या बल्ली दुर्गा प्रसाद राव विरुद्ध टीडीपी उमेदवार म्हणून त्यांनी तिरुपतीमधून २०१९ लोकसभा निवडणूक अयशस्वीपणे लढवली. [४] विद्यमान खासदार बल्ली दुर्गा प्रसाद राव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या तिरुपती जागेवरून त्यांनी २०२१ मधील पोटनिवडणूक लढवली. त्यात मद्दिला गुरुमूर्ती (वाय.एस.आर.काँग्रेस) निवडून आले.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ Samdani MN (Mar 14, 2019). "Panabaka Lakshmi in TDP: Congress leaders Panabaka Lakshmi, Harsha Kumar join TDP | Vijayawada News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-04-20 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2019-01-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-02-16 रोजी पाहिले.
- ^ "Minister of State". Ministry of Petroleum and Natural Gas. 28 September 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 September 2013 रोजी पाहिले.
- ^ "Tirupati Election Results 2019: YSRCP's Balli Durga Prasad Rao has won with 228376 votes". www.timesnownews.com (इंग्रजी भाषेत). 2021-04-20 रोजी पाहिले.
- ^ Murali, S. (2021-04-06). "Panabaka Lakshmi blames YSRCP, BJP for rise in prices of essential commodities". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-04-20 रोजी पाहिले.