पद्म पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पुरस्कार आहेत. प्रत्येक वर्षी गणराज्यदिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. प्रतिवर्षी मार्च वा एप्रिल ह्या महिन्यांत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यात राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र (सनद) तसेच एक पदक ह्यांचा समावेश असतो.[१]

पद्म पुरस्कारांचे वर्ग[संपादन]

पद्म पुरस्कार वेगवेगळ्या ३ वर्गांत प्रदान करण्यात येतात.

पद्म पुरस्कारांचा इतिहास[संपादन]

भारत-सरकारने १९५४मध्ये भारतरत्न आणि पद्मविभूषण असे दोन नागरी पुरस्कार निर्माण केले. ह्यांपैकी पद्म पुरस्कार हा पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग अशा वर्गांत विभागून देण्यात येत. ८ जानेवारी १९५५च्या राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे ह्या वर्गांना अनुक्रमे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशी नावे देण्यात आली.[१]

निवडप्रक्रिया[संपादन]

पद्म पुरस्कारासाठी व्यक्तींची निवड करण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांकडून प्रतिवर्षी एक समिती नियुक्त करण्यात येते. ह्या समितीला पद्म-पुरस्कार-समिती असे म्हणतात. मंत्रिमंडळ-सचिव (कॅबिनेट सेक्रेटरी) हे ह्या समितीचे प्रमुख असून गृहसचिव, राष्ट्रपतींचे सचिव चार ते सहा ख्यातनाम व्यक्ती समितीत सदस्य म्हणून समाविष्ट असतात. ही समिती आलेल्या नामांकनातून पुरस्कारासाठी नावे निश्चित करते आणि ही नावे समितीद्वारे पंतप्रधान आणि राष्ट्रपती ह्यांना मान्यतेसाठी सादर करण्यात येतात.[१]

नामांकने[संपादन]

पद्म पुरस्कारासाठी आलेल्या नामांकनातून निवड करण्यात येते. नामांकनाची ही प्रक्रिया सार्वजनिक स्वरूपाची असून व्यक्ती स्वतःचेच नावही ह्या पुरस्कारासाठी सुचवू शकते.

हे पुरस्कार साधारणपणे भारतीय नागरिकांना दिले जात असले तरी परदेशी व्यक्तींनाही हे क्वचित दिले जातात.[१]

संदर्भ[संपादन]


संदर्भसूची[संपादन]

  • "पुरस्कारांविषयी". २५ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]