पत्र सूचना कार्यालय
पत्र सूचना कार्यालय (इंग्लिश:प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो) (PIB) ही भारत सरकारची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत एक संबंधित संस्था (नोडल एजन्सी) आहे.[१] नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे स्थित,[२] प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो सरकारी योजना, धोरणे, कार्यक्रम उपक्रम आणि कामगिरीबद्दल प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि वेब मीडियाला माहिती प्रसारित करते. हे भारत प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत भाषांपैकी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, डोगरी, पंजाबी, बंगाली, ओडिया, गुजराती, मराठी, मेईतेई (मणिपुरी), तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम, कोकणी आणि उर्दू या १४ भारतीय अधिकृत भाषांमध्ये उपलब्ध आहे.[३][४] [५]
इतिहास
[संपादन]पत्र सूचना कार्यालयची स्थापना ही जून 1919 मध्ये ब्रिटिश सरकारच्या काळात गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक लहान सेल म्हणून करण्यात आली. ब्रिटिश संसदेसमोर भारताविषयीचा अहवाल तयार करणे हे त्याचे मुख्य कार्य होते. ते तेव्हा शिमला या ठिकाणी होते.1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर कार्यालयची अनेक वेळा पुनर्रचना करण्यात आली आहे. सूचना कार्यालय खालील बाबींवर इलेक्ट्रॉनिक , मुद्रण आणि वेब प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी प्रेसला अधिकृत निवेदन, वैशिष्ट्ये, छायाचित्रे, व्हिज्युअल माहिती आणि चित्रफीत जारी करते.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "PIB Home Page". PIB official Portal. 2 November 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 October 2012 रोजी पाहिले.
- ↑ "Sonia, PM to launch Rs 60 cr media centre". The Hindustan Times. 24 August 2013. 24 August 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 September 2013 रोजी पाहिले.
- ↑ "PIB press releases in Manipuri : 25th nov15 ~ E-Pao! Headlines". e-pao.net. 23 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-01-23 रोजी पाहिले.
- ↑ "PIB website has news in regional languages now". KanglaOnline (इंग्रजी भाषेत). 24 November 2015. 23 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-01-23 रोजी पाहिले.
- ↑ "जयदीप भटनागर यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला". pib.gov.in. ३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.