पंतसचिव चिमणाजी रघुनाथ
Appearance
पंतसचिव चिमणाजी रघुनाथ हे भोर संस्थानाचे इ.स. १८३७ ते १८७१ ह्या कालावधीत राज्यकर्ते होते. हे रघुनाथ चिमणाजी यांचे दत्तक पुत्र होते.
साताऱ्याचे मांडलिक असलेल्या भोर संस्थानाने चिमणाजींच्या राज्याभिषेकानंतर वार्षिक ९,००० रुपयांची खंडणी सुरू ठेवली. पंतसचिवांना १५ घोडेस्वार (प्रत्येकी २५ रुपये मासिक पगार अधिकतम), ११२ अरब आणि इतर मिश्र जातींचे तलवारबाज आणि बरकंदाज (प्रत्येकी ५-१५ रुपये मासिक पगार), २०० शेत सनदी (शेतजमिनीच्या बदल्यात लढणारे हंगामी सैनिक) आणि १,२२५ शेत सनदी किल्लेकरी (किल्ल्यांची राखण करणारे शेत सनदी) इतकी शिबंदी राखण्यास मुभा होती.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ सुमित्रा कुलकर्णी. गूगल बूक्स वर द सातारा राज, १८१८-१८४८: अ स्टडी इन हिस्टरी, ॲडमिनिस्ट्रेशन ॲंड कल्चर. दिल्ली. pp. ४२-४३.