पंजाबी चंदु हलवाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


पंजाबी चंदु हलवाई मिठाईवाले

महाराष्ट्रातल्या मुंबई जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड स्थानकावर उतरून पश्चिमेला बेस्ट बसने अथवा शेअर टेक्सीने वाळकेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर तीनबत्ती चौकात डावीकडे हे मिठाईचे दुकान स्थित आहे.मुंबईतील हे मुख्य दुकान असून त्यांचे मध्यवर्ती कार्यालयसुध्दा येथेच स्थित आहे.मुळचे कराचीवाले असलेले हे मिठाईवाले मुंबईभर आपल्या ताज्या, शुद्ध तूपाच्या,चविष्ट, विविध प्रकारच्या मिठाईसाठी सुप्रसिद्ध आहे. येथे तयार होणाऱ्या प्रत्येक मिठाईचे अगदी काटेकोरपणे चाचणी करून शास्त्रीय पद्धतीने उत्पादन घेतले जाते.मुख्य उत्पादन ग्रँट रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे असलेल्या कारखान्यात घेतले जाते व तिथूनच त्याचे मुंबईतील त्यांच्या सर्व शाखादुकानांत वितरण केले जाते. मुंबई बाहेर वसईमध्ये सुध्दा त्यांच्या दुकानाच्या शाखा आहेत आणि तीच गुणवत्ता आणि कार्यपद्धती वापरून ग्राहकसेवा दिली जाते. हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालू असल्याने गुणवत्तेच्या कसोटीवर आणि ग्राहकांच्या विश्वासार्हतेवर आजही भक्कम पायावर उभा आहे आणि तितक्याच जोमाने बहरत आहे.