Jump to content

पंचब्रह्म उपनिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पञ्च-ब्रह्म -उपनिषत् (sa); পঞ্চব্রহ্মা উপনিষদ (bn); Pancabrahma Upanishad (en); パーンチャブラフマ・ウパニシャッド (ja); पंचब्रह्म उपनिषद (mr); पञ्च-ब्रह्म (उपनिषद्) (new) Shaiva Hindu text (en); হিন্দুধর্মের ক্ষুদ্র উপনিষদ এবং চৌদ্দটি শৈব উপনিষদের একটি (bn); Shaiva Hindu text (en)
पंचब्रह्म उपनिषद 
Shaiva Hindu text
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी
या उपनिषदात पंचमुखी शिवाचा गौरव करण्यात आलेला आहे.

पंचब्रह्म उपनिषद हे उपनिषद कृष्ण यजुर्वेदीय परंपरेतील आहे. यात एकूण ४१ मंत्र आहेत. याचा शुभारंभ शाकलाने पैप्पलादास विचारलेल्या एका प्रश्नाने झालेला आहे. तो प्रश्न आहे - सर्वप्रथम सृष्टीप्रारंभाच्या वेळी काय उत्पन्न झाले? आधी पैप्पलादाने क्रमशः सद्योजात, अघोर, वामदेव, तत्पुरुष आणि ईशान उत्पन्न झाल्याची गोष्ट सांगितली आहे; नंतर क्रमाशः त्यांचे स्वरूपवर्णन केलेले आहे. यांनाच ‘पंचब्रह्म’ अशी संज्ञा दिलेली आहे आणि सांगितलेले आहे की ह्या पंचब्रह्म स्वरूपास आपल्या आत्म्यात प्रस्थापित करून ‘मीच पंचब्रह्म आहे’ याप्रकारे आनुभविक ज्ञान प्राप्त करून घेणारा साधक ब्रह्मामृताचे रसास्वादन करून मुक्ती मिळवितो. शेवटी ह्या पंचब्रह्मात्मक विद्येची श्रेष्ठता वर्णन करून हृदयकमलात विद्यमान सदाशिव तत्त्वाच्या अनुसंधानाचा निर्देश दिलेला आहे.