पंचदशी
Appearance
स्वामी विद्यारण्यांनी लिहिलेला ’पंचदशी’ हा अद्वैत सिद्धान्ताचा प्रमाणभूत ग्रंथ आहे.
रचना
[संपादन]या ग्रंथात विवेक, दीप आणि आनंद अशी तीन प्रकरणे आहेत. प्रत्येक विभागात पाच अशी एकूण १५ उपप्रकरणे आहेत. (म्हणून पंचदशी हे नाव.)
या ग्रंथात व्यक्तिमात्राच्या शरीरामधील जीवतत्त्वाच्या पंचकोषांची (अन्नमयकोष, प्राणमयकोष, मनोमयकोष, विज्ञानमयकोष व आनंदमयकोष) संकल्पना, ईश्वर, जग आणि जीव यांच्यातील परस्परसंबंध, कारण आणि परिणाम यांच्यातील अभेदत्व वगैरे विषयांवर सखोल विवेचन केले आहे.
पंचदशी ग्रंथातील मजकुराचे स्पष्टीकरण करणारे मराठी ग्रंथ किंवा पंचदशीचे अनुवाद
[संपादन]- श्रीगीतपंचदशी किंवा वेदान्तशतक : लेखक खंडो कृष्ण गर्दे
- पंचदशी एक अभ्यास : लेखक धनंजय मोडक
- पंचदशी परिशीलन - स्वामी विद्यारण्यविरचित पंचदशीचे सर्वंकष अध्ययन : लेखक विमल पवनीकर.
- पंचदशी भावदर्शन Archived 2016-03-04 at the Wayback Machine. : लेखक श्रीकृष्ण द. देशमुख
- सार्थ पंचदशी : लेखक द.वा. जोग
- सार्थ पंचदशी : प्रकाशक मु.द. जोग
- सुबोध पंचदशी : लेखक वि.वा. बापटशास्त्री