न्यू यॉर्क हिल्टन मिडटाउन हॉटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


न्यू यॉर्क मिल्टन मीडटाउन हे न्यूयॉर्क शहरातील सर्वात मोठे आणि जगातील सर्वात उंच 101 वे हॉटेल आहे. याची मालकी संघ स्वरूपाची आहे आणि याचे जगभरातील व्यवस्थापन हिल्टन पहातात. 47 मजल्याचे हे हॉटेल रॉकफेलर केंद्राच्या 6 व्या मार्गावरील उत्तरपछिम कोपऱ्यावर आहे. U.S.चे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.केनेडी पासूनचे पुढील सर्व अध्यक्षांनी 53 व्या रस्त्यावरील या हॉटेल मध्ये अथितींचे आथित्यपन केलेले आहे. सन 1973 मध्ये जगातील पहिला सेल फोन याच हॉटेलमध्ये मार्टिन कूपर या हॉटेल मधील पाहुण्यांनी हॉटेलचे पुढील जागेत वापरला.

इतिहास[संपादन]

या योजनेचा विकास हिल्टन हॉटेल्स संघ, रॉक फेलर ग्रुप, आणि उरीस वास्तु संघटन यांनी केला.

विल्लियम बी यांनी स्लॅब पद्दतीने याचा आराखडा तयार केला आणि योजना पूर्णत्वास नेली. 26 जुन 1963 मध्ये न्यू यॉर्क हिल्टन[१] नावाने याचे उद्घाटन झाले. यात 2153 खोल्या आहेत आणि हे न्यू यॉर्क शहरातील सर्वात मोठे हॉटेल आहे. जॉन लेन्नोन यांनी सन 1971 मध्ये येथेच भावगीते लिहिली होती असे हिल्टन हॉटेल आणि रिसॉर्ट[२] यांनी खात्रीपूर्वक विधान केले.

सन 1990,1991-1994,1998-2000 आणि 2007 मध्ये चौथे आवश्यक ती दुरूस्ती व पुंनर्रजीवन केले. त्यानंतर या हॉटेल[३] मध्ये 42 ते 44 मजल्यापर्यंत 47 सुट्स, तयार झाले. प्रत्येक सूट मध्ये साधारणपणे 600 ते 2000 sq.ft जागा उपलब्ध झाली.

हॉटेल रूम्स[संपादन]

 • दोन पलंगासह दोन रूम्स
 • किंग रुम
 • क्वीन रूम
 • दोन डबल बेडसह एक बेड रूम सूट
 • एक क्वीन बेड एक्झिक्युटिव मजला
 • दोन डबल डिलक्स रूम
 • एक किंग बेड रूम डिलक्स
 • दोन डबल बेड सह एक्झिक्युटिव डबल रूम
 • एक्झिक्युटिव किंग रूम
 • किंग बेड सह एक बेड रूम सूट
 • डिलक्स क्वीन रूम
 • दोन डबल बेड्सह डबल रूम डीश्याबिलिटी असेस
 • एक्झिक्युटिव मिनी किंग सूट
 • दोन डबल बेडसह सुपीरियर डबल रूम

आणि अशाच प्रकारच्या व विविध कितीतरी रूम्स ! या सर्व रूम्स वातानुकूलित. तसेच सर्व रूम्स[४] मध्ये टेलिफोन, हेयर ड्रायर,आयर्न, स्वतंत्र बाथरूम, सुविधा आहेत.

परिसर आणि रूम सुविधा[संपादन]

वायफाय,वातानुकूलित हॉटेल, रेस्टारंट,कॅफे,रूमसेवा,इंटरनेट,व्यवसाय केंद्र, पाण्याचा लहान कुंड, व्यायाम शाळा, 24 तास स्वागत कक्ष,एटीएम, कॅश मशीन, लौंडरी, पार्किंग, प्रदूषणरहित रूम्स, ग्रिटींग शॉप, दुतर्फा शॉपिंगसाठी दुकाने, व्हलेटपार्किंग,या सुविधा आहेत. तसेच मेजवानी देणेसाठी सुविधा आहे.

हॉटेल परिसरात 8000 sq.ft. जागेवर जीम, खानपान व्यवस्था, प्रत्येक रूम मध्ये फ्लॅटTV, मापल वूड फर्निचर, देखनी रंग सजावट, बाथरूममध्ये संगमरवर, लॉबी मध्ये अल्पोपहार व्यवस्था, तिकिटे आणि पिकनिक आरक्षण व्यवस्था ! 7वे रस्त्यावरील सबवे स्टेशन आणि 5वे रस्त्यावरील आल्हाददायक दुकाने चार मिनिटा च्या पाई प्रवासाच्या अंतरावर !

सन 2013 पासून हर्ब इन किचन रेस्टारंट चालू आहे त्यात हंगामी सल्याड्स, कृत्रिम सँडवीचेस,पिझ्झा,आणि स्पेशल कॉफीचा आस्वाद घेता येतो.

संदर्भ:[संपादन]

 1. ^ "न्यू यॉर्क हिल्टन हॉटेल". इम्पोरीस.कॉम. १७ ऑक्टोबर २०१५. 
 2. ^ "हॉटेलचा इतिहास". हिल्टन.कॉम. १७ ऑक्टोबर २०१५. 
 3. ^ "न्यू यॉर्क हिल्टन मिड टाऊन हॉटेल". क्लेअरट्रिप.कॉम. १७ ऑक्टोबर २०१५. 
 4. ^ "न्यू यॉर्क शहर मधील सर्वात मोठ्या हॉटेलची रूम सर्विस समाप्त". सीएनएन.कॉम. ५ जून २०१३. १७ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.