न्यूटन (कॅन्सस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

न्यूटन हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. हार्वे काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १९,१३२ होती.

हे शहर विचिटा शहरापासून ४० किमी उत्तरेस असून येथे ॲमट्रॅकचे रेल्वेस्थानक आहे.