Jump to content

नोकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नौकरी शोधणे या पानावरून पुनर्निर्देशित)

कोणत्याही संस्थेत किंवा सरकारमध्ये किंवा कोणत्याही संस्थेत काम करणे म्हणजे नोकरी होय. नोकऱ्या अनेक प्रकारे करता येतात. जसे सरकारी नोकऱ्या आणि खाजगी नोकऱ्या आणि निमशासकीय नोकऱ्या. याच बरोबर हल्ली एक नवीन नोकरीचा प्रकार उदयास आला आहे तो म्हणजे वर्क फ्रॉम होम (घरून काम). कोविड नंतर वर्क फ्रॉम होम मध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली.

आजही सरकारी नोकरीला प्राधान्य दिल जातं . कारण सरकारी नोकरी मध्ये भरगोस पगार त्याचबरोबर सरकारच्या विविध योजनांचा फायदा होतो. सरकारी नोकऱ्या विविध प्रकारच्या असतात जसे की राज्य सरकार, केंद्र सरकार त्याच बरोबर केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कंपन्या यासर्वांचा सरकारी नोकरी मध्ये समावेश होतो.

खाजगी नोकऱ्या या खाजगी कंपन्यांमध्ये असतात. संबंधित कंपनी त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे नियम ठरवतात आणि सर्व हक्क त्या कंपनी कडे असतात.

नोकऱ्यांविषयी जाहिराती विविध माध्यमातून दिल्या जातात जसे की वेबसाइट, वृत्तपत्र, टेलिविजन इ. सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात जॉब वेबसाईट हे नोकरी मिळवण्याचं एक प्रमुख साधन आहे. जॉब वेबसाईट या सरकारी तसेच खाजगी सुद्धा असतात.