नेव्हादो देल रुइझ
Jump to navigation
Jump to search
नेव्हादो देल रुइझ तथा ला मेसा देल हेर्वेओ हा कोलंबियामधील एक जागृत ज्वालामुखी आहे. देशाची राजधानी बोगोतापासून १२९ किमी पश्चिमेस असलेला हा ज्वालामुखी गेली अठरा लाख वर्षे सुप्त जागृतावस्थेत असल्याचे मानले जाते. याला स्थानिक प्राचीन भाषेत कुमांडे असे नाव आहे.
१३ नोव्हेंबर, १९८५ रोजी झालेल्या विस्फोटात जवळचे आर्मेरो शहर नेस्तनाबूद झाले व तेथील रहिवाशांपैकी २३,००० पेक्षा अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या होत्या. त्याचवेळी पर्वताच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या चिनचिना गावातील १,८०० व्यक्ती मृत्यू पावल्या.