Jump to content

नेपाल कम्युनिस्ट पार्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेपाल कम्युनिस्ट पार्टी हा नेपाल मधला एक साम्यवादी विचारधारेवर आधारित पक्ष आहे. हा पक्ष १५ सप्टेंबर १९४९ रोजे कलकत्ता, भारत येथे स्थापित झाला. नेकपा हा नेपाल मधील राणा हुकुमशाही, सरंजामशाही व साम्राज्यवादाला लढा देण्यासाठी स्थापन करण्यात आला. त्याचे संस्थापक अध्यक्ष पुष्पलाल श्रेष्ठ हे होते. इतर काही सदस्य नर बहादूर कर्मचाऱ्या, निरंजन गोविंदा बैध्या, नारायण बिलास जोशी हे होते.

इतिहास व पहिले काँग्रेस

[संपादन]

नेकपा ने १९५१ च्या राणा हुकुमशाहीचा पराजय करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. १९५२ च्या रक्षा दल बंडानंतर नेकाप वर २४ जानेवारी १९५२ला बंदी घालण्यात आली.[]

१९५४ मध्ये पहिले पक्ष काँग्रेस हे पटण मध्ये गुप्तपणे पार पाडण्यात आले. मनमोहन अधिकारी हे त्याचे निवडून आलेले अध्यक्ष होते.

एप्रिल १९५६ मध्ये पक्षावारची बंदी उठविण्यात आली.[]

दुसरे काँग्रेस व रायामाझींची भूमिका

[संपादन]

१९५७ साली पक्षाचा दुसरा काँग्रेस काठमांडू येथे आयोजित करण्यात आला. ह्या काँग्रेस मध्ये पक्षाची एक गणतांत्रिक रचना मांडण्यात आली. केशर जंग रायामाझी हे ह्या काँग्रेसचे अध्यक्ष होते.

१९६०चा राजेशाही धक्का ह्याचे रायामाझीने समर्थन केले. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अजोय घोष ह्यांनी रायामाझीला त्यांचे स्थान बदलून राजेशाही विरुद्धच्या संघर्षाला सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.[]

पक्षातील फुट

[संपादन]

१९६१ च्या सुरुवातीला सर्व राजकीय पक्षांवर बांधी घालण्यात आली. रायामाझीने राजेशाहीवर विश्वास प्रकट केल्याने पक्षातील इतर सदस्यांने कडक प्रतिक्रिया दिल्यात. हे मतभेद सोडविण्यासाठी एक महिना पूर्णत्व सभा घेण्यात आली, ज्यामधून पक्षाच्या ३ वेगळ्या वंशावली निघाल्या.[]

एप्रिल १९६२ मध्ये पक्षाच्या एका भागाने तिसरे काँग्रेस वाराणसी येथे आयोजित केले. तेथे राष्ट्रीय लोकशाही क्रांती हा तुलसी लाल अमात्य ने मांडलेला पैलू स्वीकारण्यात आला, व अमात्य ह्यांना अध्यक्ष म्हणून निवडून आणण्यात आले. रायामाझीला पक्षाबाहेर काढण्यात आले. पण रायामाझीच्या सामार्थाकांने हा काँग्रेस अवैध सांगितला. त्यामुळेच नेकापचे २ पक्षांमध्ये रूपांतर झाले, व पुढे चालून आणखी तुकडे, जुळवणे व पुनर्नामांकन झाले.[]

सध्या स्थिती

[संपादन]

2015 मध्ये खाडगाप्रसाद ओली, हा कम्युनिस्ट परतीचा नेता नेपाळचा पंतप्रधान बनला.[] ऑक्टोबर २०१७ मध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या अनेक तुकड्याने एकत्रित येऊन निवडणूक लढले.[] तरीही एक पक्ष राज्याची संकल्पना ही कम्युनिस्ट पक्षांनी खूप आधी सोडली, असे काठमांडू मतदारसंघाचे उमेदवार डॉ. राजन भात्ताराई बोलले.[] कम्युनिस्ट पक्श युतीने २०१७ची निवडणूक बहुमताने जिंकली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Joshi, Bhuwan Lal; Rose, Leo E. (1966). Democratic Innovations in Nepal: A Case Study of Political Acculturation (इंग्रजी भाषेत). University of California Press.
  2. ^ "Wayback Machine". 2007-02-06. रोजी मूळ पानापासून संग्रहित2007-02-06. 2018-03-25 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  3. ^ Parajulee, Ramjee P. (2000). The Democratic Transition in Nepal (इंग्रजी भाषेत). Rowman & Littlefield. p. 72. ISBN 9780847695775.
  4. ^ [१]
  5. ^ Kathm, Associated Press in; u (2015-10-11). "Communist party leader elected as Nepal's new prime minister". the Guardian (इंग्रजी भाषेत). 2018-03-25 रोजी पाहिले.
  6. ^ Voice, People’s (2017-10-26). "Nepal's communist parties to merge ahead of elections". People's World (इंग्रजी भाषेत). 2018-03-25 रोजी पाहिले.
  7. ^ "'No goal of establishing single party authoritarianism' - News, sport and opinion from the Kathmandu Tribune's global edition". News, sport and opinion from the Kathmandu Tribune's global edition (इंग्रजी भाषेत). 2017-11-22. 2018-03-25 रोजी पाहिले.
  8. ^ Prashad, Vijay (2017-12-13). "Communists Sweep the Nepali Elections, a Blow to the Establishment Parties". AlterNet. 2018-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-25 रोजी पाहिले.