नेति नेति

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिंदू धर्मात, विशेषतः ज्ञानयोगात आणि अद्वैत वेदान्तात, नेति नेति (न इति, न इति) या संस्कृत वचनाचा अर्थ "हे नाही, हे नाही" असा अथवा "हेही नाही, तेही नाही" असा होतो. नेति हा शब्द न इति म्हणजे "असे नाही" या शब्दांच्या संधीतून तयार झालेला आहे. हे वचन उपनिषदांमध्ये व अवधूत गीतेमध्ये आढळते आणि ब्रह्मज्ञान करवून घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला ब्रह्म काय काय नाही याचे विश्लेषक स्पष्टीकरण देते.