निलीमा (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निलीमा, निळा मक्षाद
शास्त्रीय नाव Cyornis tickelliae
Muscicapa tickelliae
कुळ जल्पकाद्य
(Muscicapidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Tickell's Blue Flycatcher
संस्कृत नील मक्षाद

वर्णन[संपादन]

साधारणपणे चिमणीपेक्षा थोडा लहान आकाराचा (११ ते १२ सें.मी.) हा पक्षी आहे. यातील नर पाठीकडून निळा, पोटाकडे पांढरा, गळा व छातीचा भाग तांबूस, खांद्यावरचा काही भाग आणि भुवया आकाशी रंगाच्या असतात तर मादी नरापेक्षा फिकट रंगाची असते.

सतत जागोजागी फिरत राहण्याच्या सवईमुळे या पक्ष्यांना नर्तक पक्षी म्हणूनही ओळखले जाते.

वास्तव्य/आढळस्थान[संपादन]

निलीमा (पक्षी) भारतासह श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया या देशातही आढळतो.

रंग आणि आकाराच्या तपशीलात थोडा फरक असलेया याच्या किमान दोन उपजाती आहेत. भारतातील जात Muscicapa tickelliae tickelliae आहे आणि श्रीलंका येथील Muscicapa tickelliae jerdoni ही आहे.

दमट पानगळीची जंगले, सदाहरित जंगले, लहान झुडपी जंगले आणि बांबूच्या जंगलात यांचे वास्तव्य असते.

खाद्य[संपादन]

हा पक्षी उडते कीटक खाण्यात पटाईत आहे.

प्रजनन काळ[संपादन]

मार्च ते ऑगस्ट हा काळ या पक्ष्यांचा वीणीचा काळ आहे. पाने, मूळ, शेवाळे वगैरे वापरून बनविलेले घरटे सहसा बांबूच्या बुंध्यात लपविलेले असते. मादी एकावेळी ३ ते ५ फिकट तपकिरी रंगाची त्यावर तुटक लालसर रेषा असलेली अंडी देते. नर-मादी मिळून पिलांची देखभाल करतात.

चित्रदालन[संपादन]