निलगिरी (वनस्पती)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निलगिरीची झाडे ऑस्ट्रेलियात तसेच विंचुर,तमिळनाडूमधील निलगिरी पर्वतावर मोठ्या प्रमाणात आढळतात. निलगिरीच्या पानांपासून मिळवले तीव्र गंध असलेले युकॅलिप्टस ऑईल हे डोकेदुखी, दातदुखी, पडसे आदी विकारांत गुणकारी असते. केसांना लावल्यास निलगिरीच्या तीव्र वासामुळे उवा पळून जातात.

कमी पाऊस असलेल्या प्रदेशांतील उंचच्या उंच वाढणारी निलगिरीची झाडे ही फार शुष्क असतात. त्यांची फारशी सावलीही पडत नाही. झाडावर पक्षी घरटी करत नाहीत. त्यांच्या आसपासचे वातावरण फार कोरडे असते. झाडे उगवल्यानंतर फटाफट वाढतात. त्यासाठी ती जमिनीतून प्रचंड प्रमाणात पाणी ओढून घेतात, व विहिरी कोरड्या पडू शकतात.

झाडांचे खोड पांढरे असते. त्याच्यापासून फर्निचर बनू शकते.

निलगिरी
निलगिरी वृक्षाची पाने व फुले
निलगिरी वृक्षाची पाने व फुले
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: मॅग्नोलियोफायटा
जात: मॅग्नोलियोप्सिडा
वर्ग: मिर्टेल्स
कुळ: मिर्टाकी
जातकुळी: युकॅलिप्टस
चार्लस लुईस
तमिळनाडू