निपुण धर्माधिकारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निपुण धर्माधिकारी (जन्म : १९८७) हे एक मराठी प्रतिभाशाली नाट्यकलावंत आणि नाट्य दिग्दर्शक/निर्माते आहेत.

त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून झाले. कॉलेजात असताना त्यांनी २००३ सालापासून पुरुषोत्तम करंडक नाट्यस्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली.

कारकीर्द[संपादन]

निपुण धर्माधिकारी यांनी अगदी तरुण वयात म्हणजे २००९ साली पुण्यात 'नाटक कंपनी' नावाची नाट्यसंस्था काढली. ही कंपनी मराठीतली जुनी पाच-अंकी संगीत नाटके त्याच पारंपरिक पद्धतीत सादर करते. ही कंपनी ते स्वतःच्या खर्चाने स्वतःच चालवतात.

कंपनीतले सुमारे ५० नाट्यकर्मी हे नाटकांचे लेखन, निर्मिती, दिग्दर्शन आणि दिमाखदार सादरीकरण या सर्वच गोष्टी यशस्वीरीत्या पार पाडतात. 'नाटक कंपनी'चे नाट्यप्रयोग महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर दिल्लीत आणि अमेरिकेतही होतात. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या 'भारत रंग महोत्सवा'त 'नाटक कंपनी'चे प्रयोग हमखास सादर होतात.

व्यावसायिक नाटकांत उतरण्याआधी ते प्रायोगिक नाटके सादर करणाऱ्या मंडळींच्या वर्तुळात होते. त्या अनुभवाने समृद्ध झालेल्या निपुण धर्माधिकारी यांनी नाटकाच्या सादरीकरणामध्ये केलेल्या वैविध्यपूर्ण प्रयोगांना देशात आणि परदेशांत चांगलीच दाद मिळते.


(अपूर्ण)